पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित असलेल्या निगडी येथील नॉव्हेल इन्स्टिट्यूटच्या हॉटेल मॅनेजमेंटमध्ये दरवर्षी १४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’चा दिवस ‘लायब्ररी डे’ म्हणून साजरा केला जातो. उद्या देखील त्याच प्रमाणे ‘लायब्ररी डे’ साजरा केला जाणार असल्याची माहिती नॉव्हेल इन्स्टिट्यूटचे विश्वस्त, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या मनात पुस्तकांविषयी प्रेमाची भावना निर्माण व्हावी व त्यांनी अधिकाधिक पुस्तके वाचून समृध्द व्हावे, ही त्यामागची भावना असल्याचे गोरखे यांनी म्हटले आहे. सदर कार्यक्रमात पुस्तक-प्रदर्शनासोबतच वेगवेगळया महाविद्यालयीन उपक्रमांमध्ये तसेच स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात येणार आहे.
दरम्यान, निगडी येथील नॉव्हेल NIBR कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी येथे महाराष्ट्रातील नामवंत गझलकार प्रदीप निफाडकर यांचा काव्यप्रवास व इतर अनुभव याविषयी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद कार्यक्रमाचे १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत आयोजन केले आहे.






















Join Our Whatsapp Group