पिंपरी (Pclive7.com):- चिंचवडमध्ये मिसाईलच्या बुलेट आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. लष्कराच्या हद्दीतून या बुलेट बाहेर कशा आल्यात असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालायं.
चिंचवड येथील चाफेकर चौकातील भंगाराच्या दुकानाशेजारी या मिसाईल बुलेट आढळल्या आहेत. एकूण चार मिसाईल बुलेट असून त्या गंजलेल्या अवस्थेत सापडल्यात. त्यात कोणताही दारुगोळा नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या बुलेट कोणत्या भंगार मालकाने, कोठून, कोणाकडून आणि कधी विकत घेतल्या याचा तपास चिंचवड पोलीस घेत आहेत. मात्र रहदारीच्या ठिकाणी लष्कराचे मिसाईल बुलेट आढळल्याने चिंचवड आणि परिसरात तो चर्चेचा विषय ठरला आहे.






















Join Our Whatsapp Group