पिंपरी (Pclive7.com):- जागतिक महिला दिनानिमित्त माजी महापौर राहुल जाधव यांच्या वतीने खास महिला भगिनींसाठी ‘खेळ रंगला पैठणी’चा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिला भगिनींच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी राहुल जाधव यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. तसेच प्रथम क्रमांक, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्या महिलेस एलसीडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, सोन्याची नथ व मानाची पैठणी भेट देऊन गौरवण्यात आले.

यावेळी बोलताना माजी महापौर राहुल जाधव म्हणाले की, प्रत्येक महिलेमध्ये ज्याप्रमाणे एक आई, एक बहीण, एक पत्नी असते.. त्याचप्रमाणे प्रत्येक महिलेमध्ये एक कलाकार पण दडलेला असतो. म्हणूनच त्यांच्या कलागुणांना हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी तसेच इतर महिलांमध्ये जागृती करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्व महिला भगिनींसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था राहुल जाधव स्पोर्टस् फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली होती. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या सुकन्या साक्षी महेशदादा लांडगे, दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन मंगलताई राहुल जाधव, प्रीती बोंडे, संगीता भोसले, सोनमताई रवींद्र जांभुळकर तसेच सामाजिक कार्यकर्ते संभाजी घारे, रवी जांभुळकर, महेंद्र मंडलिक, प्रताप भांबे, रवी आण्णा भुजबळ आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group