पुणे (Pclive7.com):- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. खडसे यांच्या प्रवेशाबद्दल आपल्याला काही माहित नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. ते पुण्यात रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.
राजकीय जीवनात असताना अनेक लोकांच्या भेटीगाठी होत असतात. आपल्याला काहीजण भेटून गेले. भेट झाल्याने काही काळंबेरं आहे असं कोणी समजू नये. राज्यात भाजपचं सरकार सत्तेत असताना देखील त्यांना आम्ही भेटत होतो. मी तर सगळ्यांना भेटत असतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नागपूर येथे होणार्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हे फेरबदल होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात काही खात्यांची अदलाबदल, तर काही नवीन चेहर्यांचा समावेश करून एखाद्या विद्यमान मंत्र्याला डच्चू मिळणार असल्याची चर्चा आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांच्याकडे कृषीखात्याची जबाबदारी देण्याचे संकेत मिळत आहेत.





















Join Our Whatsapp Group