पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना युवासेना शाखा रुपीनगर कडून प्रभाग क्र.१२, रूपीनगर – तळवडे मधील अनेक प्रलंबित राहिलेली कामे चौकशी करून त्वरित कामे पूर्ण करावीत. अन्यथा शिवसेना युवासेना शाखेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.काळे यांना रुपीनगर शिवसेना युवासेना शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, विभागप्रमुख नितिन बोंडे, युवासेना विधानसभा चिटणीस अमित शिंदे, शाखा प्रमुख प्रवीण पाटील, सहदेव चव्हाण, रमेश पाटोळे, नामदेव नरळे, उपविधानसभा अधिकारी सुनिल समगिर तसेच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
प्रभाग क्र.१२, रूपीनगर – तळवडे मधील अनेक कामे प्रलंबित राहिलेली आहेत. या कामांची चौकशी करून त्वरित कामे पूर्ण करावीत तसेच सहयोगनगर मधील डिपी रोड लवकर पूर्ण करावा. तसेच प्रभागातील रस्त्यांचे पूर्ण डांबरीकरण लवकर करावे असे निवेदन कार्यकारी अभियंता श्री. काळे यांना देण्यात आले.
सदर अर्जाची दखल न घेतल्यास शिवसेना युवासेना शाखा रुपीनगर तीव्र आंदोलन करेल असे निवेदन देण्यात आले. यावेळी सखोल कामाची चौकशी करून त्वरित काम पुर्ण केले जाईल असे आश्वासन श्री.काळे यांनी दिले.






















Join Our Whatsapp Group