पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे शिवसेना नगरसेवक सचिन भोसले प्रकाशित ‘उद्धवश्री दिनदर्शिका २०२१’चे प्रकाशन मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
नगरसेवक सचिन भोसले यांच्या माध्यमातून दरवर्षी दिनदर्शिकेचे प्रकाशन केले जाते. यंदाच्या वर्षीही खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते ‘उद्धवश्री दिनदर्शिका २०२१’चे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, अमित उबाळे, समीर पवार, अजय पवार, निलेश गायकवाड, लक्ष्मण मोरे, राहुल शर्मा, गणेश शितोळे, किरण पाटील, संदीप येळवंडे, पंकज आप्पा दीक्षित, मंदार अनंत येळवंडे, हनीफ शेख, सचिन झरेकर, प्रज्वल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.