पिंपरी (Pclive7.com):- शिवजयंती व भिमजयंती निमित्त संघर्ष स्पोर्टस क्लब व शेखरभाऊ ओव्हाळ मित्र परिवारच्या वतीने भव्य हापपिच लाँग टेनिस स्पर्धा आज संपन्न झाल्या. या स्पर्धेत शुभम वाल्हेकर स्पोर्ट क्लब हा संघ विजयी झाला.
या स्पर्धेत व्दितीय क्रमांक श्री काटे स्पाेर्ट क्लब यांनी पटकावला. तर तृतीय क्रमांक विजयदादा खळदकर स्पोर्ट फाउंडेशन व चतुर्थ क्रमांक महाराज प्रतिष्ठान या संघा आला. तसेच पाचव्या क्रमांक अजिंक्य भिसे स्पोर्ट क्लब या संघाने पटकविला.
या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभासाठी आलेल्या सर्व मान्यवर व क्रिकेटप्रेमींना मुख्य आयोजक शेखरभाऊ ओव्हाळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रथम क्रमांक पटकविलेल्या शुभम वाल्हेकर स्पोर्ट क्लब यांना नगरसेवक मोरेश्वर भाऊ भोंडवे यांच्याकडून 55,555 रूपये, द्वितीय क्रमांक श्री काटे स्पाेर्ट क्लब यांना चेतनभाऊ भुजबळ यांच्याकडुन 44,444 रुपये, तृतीय क्रमांक विजयदादा खळदकर स्पोर्टस फाउंडेशन यांना शेखरभाऊ ओव्हाळ यांच्याकडुन 33,333 रुपये व चतुर्थ क्रमांक महाराज प्रतिष्ठान यांना नगरसेविका रेखाताई दर्शिले यांच्याकडुन 22,222 रुपये आणि पाचवा क्रमांक पटकविलेल्या अजिंक्य भिसे स्पोर्टस क्लब यांना सागर बोरगे यांच्याकडुन 11,111 रूपये असे भव्य बक्षिस देण्यात आले. तसेच शशिकांत बोरगे व सर्जेराव पवार यांच्याकडून सर्व संघांना ट्रॉफी देण्यात आली.
यावेळी नगरसेवक शेखरभाऊ ओव्हाळ, कार्यक्षम नगरसेवक मोरेश्वरभाऊ भोंडवे, शिक्षण मंडळाचे सभापती चेतनभाऊ भुजबळ, नगरसेविका श्रीमती रेखाताई दर्शिले, RPI महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमितभाऊ मेश्राम, उद्योजक गिरीषभाऊ जाचक, बाळूभाऊ दर्शिले, सचिन दादा साकोरे, सरपंच तात्या मोहिते, अशोकनाना ओव्हाळ, श्रीमती अनुसाई ओव्हाळ माध्यमिक विद्यालयचे अध्यक्ष प्रल्हादभाऊ ओव्हाळ, सुरेशतात्या रानवडे, मारुती तात्या दर्शिले, संपतदादा ओव्हाळ, बाळूअण्णा ओव्हाळ, मुरलीधरतात्या ओव्हाळ, बाळूतात्या ओव्हाळ, सुभाषमामा लगाडे, सर्जेराव पवार, शशिकांत बोरगे, सागर बोरगे, बाळासाहेब बोरगे, भंडारीसाहेब, मोहनभाऊ ओव्हाळ, मधुकरनाना ओव्हाळ, संतोषभाई मोहिते तसेच सर्व जेष्ठ व तरुणवर्ग, संघर्ष स्पोर्ट्स क्लब व बाबा ग्रुपचे कार्यकर्ते व पुनावळेगावचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच शेखरभाऊ ओव्हाळ यांनी सर्व क्रिकेट प्रेमींचे कतुक केले. तसेच सर्वाचे अभिनंदन केले आणि पाच दिवस क्रिकेटस्पर्धा उत्साहपुर्ण वातावरणात पार पाडली त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले.





















Join Our Whatsapp Group