पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील दि.सेवा विकास को-ऑप बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी रविवारी (दि.०७) रात्री उद्योगपती व माजी उपमहापौर अमर मूलचंदानी यांना ताब्यात घेण्यात आले होते. न्यायालयाने मूलचंदानी यांना १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिंपरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची बँक म्हणून सेवा विकास बँक प्रसिद्ध आहे. या बँकेचे अमर मूलचंदानी अध्यक्ष होते. त्यांनी २०१० ते २०१९ पर्यंत २३८ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या गुन्ह्याप्रकरणी मूलचंदानी यांना रविवारी रात्री आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हाही नुकताच मूलचंदानी यांच्यावर दाखल झाला होता. यापूर्वी दि सेवा विकास बँकेतून कागदपत्रे चोरणे, फसवणूक असे गुन्हे त्यांच्यावर दाखल होते. या प्रकरणात अटक केल्यानंतर मूलचंदानी यांना न्यायालयाने १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.






















Join Our Whatsapp Group