पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी च्या ४१ व्या स्थापना दिनानिमित्त भाजपाध्यक्ष आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर यांच्यावतीने शहरातील प्रमुख ब्लड बँकाना भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांचा सत्कार करून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सामाजिक भान दाखवून केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कोरोनावरती मात करण्याकरीता प्लाझ्मा हा प्रमुख शस्त्र मानला जातो. शहरातील नागरिकांकरिता प्लाझ्मा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच नागरिकांना ह्या आजारातून मुक्त करण्याकरिता मोलाचे योगदान या रक्तपेढ्यांचे आहे असे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस दिनेश यादव, उपाध्यक्ष शिवराज लांडगे, प्रसाद कस्पटे, दिपक घन व इतर पदाधिकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group