पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा निरीक्षक पदी कविता आल्हाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते तसेच महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या उपस्थित नियुक्ती पत्र देण्यात आले. या प्रसंगी कविता संदेश आल्हाट यांना पुणे जिल्हा निरिक्षक पदी नियुक्ती देण्यात आले.
यावेळी जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे, पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक भारती शेवाळे तसेच भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष संगीता आहेर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अधिकाअधिक महिलांपर्यंत पोहचवण्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





















Join Our Whatsapp Group