पिंपरी (Pclive7.com):- कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने १६ जानेवारी रोजी कोविड-१९ च्या लसीकरणाला सुरुवात केली. तीन महिन्यात महापालिकेने ३ लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत ३ लाख ३ हजार ३४९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या ६२ आणि खासगी २९ लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. नोंदणीकृत आरोग्य सेवा देणारे, फ्रंट लाईन वर्कर आणि ४५ वर्ष वयाच्या पुढील नागरिकांना लस दिली जात आहे.
२३ मार्च रोजी एक लाखाचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर ६ एप्रिल रोजी दोन लाखांचा तर १७ एप्रिल रोजी तीन लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण कारण्यात आले आहे.
आरोग्य सेवा देणाऱ्या २३ हजार ८८९ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ११ हजार ५५४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. फ्रंट लाईन वर्कर या गटातील २४ हजार १८९ जणांनी पहिला तर ६ हजार ६४६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ ते ६० वर्ष वयोगटातील १ लाख २४ हजार ७८७ नागरिकांनी पहिला तर २ लाख ८४३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ६० वर्षांवरील १ लाख १ हजार ६६५ नागरिकांनी पहिला तर २८ हजार ८१९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
एकूण ३ लाख ३ हजार ३४९ पैकी २ लाख ७४ हजार ५३० जणांनी कोविड-१९ लसीचा पहिला तर २८ हजार ८१९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.






















Join Our Whatsapp Group