पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीत मोरवाडी येथील ग्रेडसेपरेटरमध्ये मोठी क्रेन दिशादर्शक फलकाच्या कमानीला धडकल्याने मोठा अपघात घडला. या धडकेत भव्य दिशादर्शक कमान कोसळी असून सुदैवाने कोणतीही जीवितहाणी झाली नाही. लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला.
मोठ्या कंपन्यांमध्ये अवजड साहित्य उचणारी क्रेनची वाहतुक करणारा ट्रक मोरवाडी चौकातील ग्रेट सेपरेटरच्या सुरूवातीस लावण्यात आलेल्या कमानीला धडकल्याने लोखंडी कमानच कोसळली. सुदैवाने लॉकडाऊन असल्यामुळे रस्त्यावर वाहतुक किरकोळ होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या अपघातानंतर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आहेत. पोलीसांनी पिंपरी चौकाजवळील ग्रेडसेपरेटर मधून व मोरवाडी ग्रेडसेपरेटर मधून होणारी वाहतुक वळवली. तसेच सध्या ही कमान हटविण्याचे काम सुरू आहे.