पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी महानगरपालिकडे पाठपुरावा केल्यामुळे वाकड येथे आबाजी भूमकर शाळा, भूमकर वस्ती येथे शनिवार पासून कोविड लसीकरण केंद्र करण्यात आले आहे.
या परिसरातील नागरिकांची गरज ओळखून विशाल वाकडकर यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पत्राव्दारे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती.
सदर लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील साहेब, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अति. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी सुषमा शिंदे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता इंजिनीअर, वैद्यकीय अधिकारी डॉ. आसावरी ढवळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल शिंदे आणि लसीकरण केंद्रातील सर्व डॉक्टर, परिचारिका यांनी केलेल्या सहकार्याबद्दल विशाल वाकडकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.
वाकड परिसरातील सर्व नागरिकांनी या लसीकरण केंद्रात येऊन कोरोनाची लस घ्यावी तसेच शासनाने सांगितलेल्या सुरक्षित अंतर पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, हात धुणे या नियमांचे पालन करावे असेही आवाहन विशाल वाकडकर यांनी केले.