पिंपरी (Pclive7.com):- राज्यात लसीचा तुटवडा आहे. अशातच आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे लसीच्या नोंदणीसाठी वशिलेबाजी होत असल्याचा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी केला आहे. पहिल्या एका मिनिटातच सर्व स्लॉट बुक असल्याचे दिसून येत आहेत. याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून, ही गंभीर असल्याचे सतीश कदम यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात लसीसाठी नोंदणी बंधनकारक असल्याने नागरिक नोंदणीसाठी प्रतिक्षा करत होते. पण, लस नोंदणीसाठी संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्व स्लॉट बुक असल्याचे दिसून आले. यामुळे नागरिकांकडून देखील संताप व्यक्त केला जात आहे. साडेसात वाजता सुरू होणारा स्लॉट बरोबर साडेसातलाच बुक कसा काय दाखवू शकतो ? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, लस नोंदणीसाठी संकेतस्थळ हॅक केलं जात असल्याच्या देखील बातम्या प्रसारित होत आहेत. यामध्ये आयटी क्षेत्रातील कोडर्स लसीच्या उपलब्ध स्लॉट बाबत आगाऊ सूचना मिळावी यासाठी एक सिस्टीम तयार केली आहे. यातून काहीजणांची आपोआप नोंदणी होत आहे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण नोंदणी सुरू झाली त्यासाठी महापालिकेने आठ केंद्रे सुरू केली आहेत.
लसीकरणासाठी आदल्या दिवशी नावनोंदणी करून अँपॉइंटमेंट घ्यावी लागते. मात्र, अवघ्या क्षणांत सर्व स्लॉट बुक झाल्याचे दिसून येत आहेत. एवढ्या वेगात बुकिंग करणं शक्य नसल्याने या बाबत शंका वाटत आहे.
लसीसाठी अगाऊ नोंदणी हा बनावट प्रकार असल्याने. लस नोंदणीसाठी होत असलेला सावळा गोंधळ यामुळे सामान्य नागरिकांना लस कशी मिळणार असा सवाल डॉ, बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी उपस्थित केला आहे.






















Join Our Whatsapp Group