पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना शाखा मोहननगर व विशाल यादव युवा मंच यांच्यावतीने आज (दि.२६) समाजातील नागरिकांसाठी वेळोवेळी मदतीस धावून जाणारे, रिक्षाचालक बांधवांसाठी धान्याचे कीट वाटप करत मदतीचा हात दिला आहे.
गेल्या वर्षीचा लॉकडाऊन तसेच यावर्षीच्या लॉकडाऊनमध्ये स्थानिक रिक्षाचालकांच्या धंद्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्यामुळे किराना साहित्याचे किट देत छोटीशी मदत करण्यात आली.
यावेळी शिवसेना नगरसेविका मीनल विशाल यादव, शिवसेना विभागप्रमुख नानासाहेब काळभोर, शाखाप्रमुख नागेशजी नामदे, विवेक पोटघन, सतीश चौधरी, हर्षल मेहेर, विराट भिलारे, राजूशेठ खजिनदार, नितीनशेट अगरवाल, शैलेशजी तांबे सर्व शिवसैनिक, परिसरातील रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group