पिंपरी (Pclive7.com):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 30 मे रोजी 7 वर्षे पूर्ण होत आहेत. या 7 वर्षात नरेंद्रभाईंनी देशात आमुलाग्र बदल घडविले व देशाला प्रगतीपथावर नेले. हे करत असताना नरेंद्र मोदी यांच्या कार्याची जागतिक पातळीवर दाखल घेतली गेली आहे. आज केंद्रातील भाजप सरकार ला 7 वर्षे पूर्ण होत आहेत त्याप्रित्यर्थ शहरात आनंदोत्सव ना करता गरजूना मदत करून सेवाभावी उपक्रम राबविण्याचा निर्धार केला. शहरातील कोरोना रूग्णांची चाचणी केली.
त्यानुसारच सेवा सप्ताहाच्या माध्यमातून भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील तसेच युवती अध्यक्षा मिना केदार यांच्या नेतृत्वाखाली आणि युवती सहसंयोजिका वैशाली खाड्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष संकेत चौंधे यांच्या सूचनेनुसार आज शासकीय रुग्णालयातील डॉक्टर YCM चे डॉक्टर वाबळे, वैद्यकीय अधिकारी दादेवर, डॉक्टर कुबडे, डॉक्टर श्राॅफ, डॉक्टर विजया आंबेडकर, डॉक्टर लुईस तसेच ज्या पॅथॉलॉजी लॅबने शहरातील कोरोना रूग्णांची चाचणी केली आहे. अशा पॅथॉलॉजी लॅबचा सत्कार करण्यात आला.
या वेळी उपस्थित प्रदेश सहसंयोजिका वैशाली खाड्ये आणि युवती विभागाच्या सोनम गोसावी, ज्योती खंडारे, सिद्धी सोनावणे, पुजा पांडेय उपस्थित होत्या.






















Join Our Whatsapp Group