पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरव तसेच नवी सांगवी परिसरात सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून दुचाकीस्वार, पायी चालणारे नागरिक, लहान मुले, जेष्ठ नागरिक यांना मोठी कसरत करून या रस्त्यावरून जावे लागत आहे. तरी महापालिका प्रशासनाने या मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी व गजानन धाराशिवकर यांनी केली आहे.
पिंपळे गुरव तसेच नवी सांगवी परिसरात सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. पाच ते दहा गटगटाने मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडुन बसलेली असतात. त्यामध्ये वळू (पोळ) पण असतात. महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत सगळीकडे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम चालू केले आहे. पावसाळी दिवस असल्यामुळे रस्ते निसरडे होत आहेत. त्यातच कोरोनामुळे लॉकडाऊन चालू आहे. कोरोनामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. शासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे नागरिक आपल्या व्यवसायाठी व नोकरीसाठी बाहेर पडत आहेत. अशा वेळी चौकाचौकात मोठ्या संख्येने मोकाट जनावरे पाहवयास मिळत आहेत.
या जनावरांना नागरिकांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तर वेळप्रसंगी अंगावर ही धावून येतात. वाहन चालकांना जिव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. अशावेळी अपघात होण्याची दाट शक्यता असते, मोकाट जनावरांचा धोका वाहन चालकांबरोबरच जेष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांनाही आहे. उभी असलेली मोकाट जनावरे काटे पुरम चौकातील आहेत. असे अनेक ठिकाणी सकाळ, संध्याकाळी जास्त प्रमाणात असतात. तरी महापालिका प्रशासनाने या मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने करण्यात आली आहे.


















Join Our Whatsapp Group