पिंपरी (Pclive7.com):- जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संभाजीनगर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे व नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या वतीने व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला करण्यात आला.
यावेळी अमित गोरखे म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी हितकारी निर्णय घेवुन स्वराज्य चालविले त्याची आठवण म्हणून ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन सोहळा सर्वत्र साजरा होत आहे. त्याचप्रमाणे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षाच्या कार्यकाळात जनविकासाच्या असंख्य निर्णयाची महत्वकांक्षी अंमलबजावणी करत कोरोना महामारीत अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले आहेत.
भारतीय जनता पक्षाने शेवटच्या घटकापर्यंतचा जाणिवपुर्वक विचार करून त्यांच्या उत्कर्षासाठी सतत काम सुरू ठेवलेले आहे. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडत असून जागतिक तापमानवाढीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वृक्ष संतुलन राखले जावे पर्यावरण जोपासले जावे यासाठी संपुर्ण पिंपरी चिंचवड मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक गावात वृक्षारोपण मोहिम राबविली जात आहे.
गेल्या एक ते दीड वर्षापासून संपूर्ण जगासह राज्यातही कोरोनाने थैमान घातलेले असून कोरोनाच्या दुस-या लाटेत अनेक रुग्णांना प्राणवायूची गरज भासली होती. त्याचा विचार करुन संपूर्ण मानव जातीने नैसर्गिक संपत्ती जोपासणे गरजेचे असून याकरीता वृक्ष संवर्धन ही काळाची खरी गरज आहे. त्यामुळे येणा-या पिढीसाठी आपण निश्चितच योगदान देऊ शकतो, या भावनेने उपक्रमामध्ये सर्वांनींच सहभागी व्हावे असे आवाहन प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group