पिंपरी (Pclive7.com):- कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा संपला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील लसीकरण उद्या (शुक्रवार दि.०२) रोजी बंद राहणार आहे. शहरातील सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय साथरोग अधिनियम 1988 अन्वये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. कोविड 19 या आजारावर केंद्र शासन व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांप्रमाणे 16 जानेवारी 2021 पासून आरोग्य कर्मचारी (HCW), 2 फेब्रुवारी पासून आघाडीचे कर्मचारी (FLW), 1 मार्च पासून 60 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण तसेच 1 एप्रिल 2021 पासून 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण आणि 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण सुरू आहे.
कोरोना लसीचा साठा उपलब्ध नसल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत.





















Join Our Whatsapp Group