पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उचलला आहे. पोलिसांनी चिंचवड येथील सुरज उर्फ ससा वाघमारे आणि म्हाळुंगे येथील संतोष मांजरे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शुक्रवारी (दि.१६) यासंदर्भातील आदेश दिले आहेत.
चिंचवड येथील टोळी प्रमुख सुरज उर्फ ससा राजू वाघमारे (वय-२४) स्वप्नील सिद्राम माडेकर (वय-२३), राजा सिद्राम माडेकर (सर्व रा. आनंदनगर, चिंचवड) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या टोळीवर खुनाचा प्रयत्न, दुखापत, अवैध शस्त्र बाळगणे यासारखे ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या जोरावर ते परिसरात दहशत माजवत होते.यामुळे त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. अशी माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे यांनी दिली.
म्हाळुंगे येथील टोळीप्रमुख संतोष मधुकर मांजरे (वय-३० रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड), आकाश उर्फ गणेश रवी उर्फ रवींद्र धर्माळे (वय-१९), ऋषिकेश उर्फ गोट्या सुनील भालेराव (वय-२०), गौरव गजानन मुळे (वय-२०), अक्षय अशोक शिवळे (वय-२५), दीपक बाळू पिंजन (वय-२५), वैभव उर्फ सोन्या अरुण खोंडगे (वय-२२ सर्व रा. म्हळुंगे, ता खेड), विनोद उर्फ सोन्या गणेश पवार (वय-१९ रा. शेलू, ता. खेड), अभिषेक बुद्धसेन पांडे (वय-१९ रा. खालुंब्रे), अनिल शांताराम शिंदे (वय-२२ रा. आंबोली, ता. खेड), ऋषिकेश बाळू रोकडे (रा. भांबोली,ता. खेड), सौरभ सोनवणे (रा. बिड) यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवई करण्यात आली आहे. या टोळीवर खून, दरोडा, जबरी चोरी, विनयभंग, खंडणीसाठी दुखापत, अवैध शस्त्र बाळगणे असे गंभीर १२ गुन्हे दाखल आहेत.
चिंचवड आणि म्हाळुंगे येथील गुन्हेगाराच्या टोळ्या परिरात दहशत पसरवत होत्या. गुन्ह्यांच्या जोरावर स्वत:च्या आर्थिक फायदा करवून घेत होत्या. यामुळे या दोन टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या दोन्ही प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंजुरी देत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कारवाई उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, म्हाळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे, पोलीस कर्मचारी सचिन चव्हाण यांनी ही कारवाई केली.