पिंपरी (Pclive7.com):- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) भोसरी डेपोतील मोकळ्या जागेत पावसाचे पाणी साचून डास उत्पत्ती होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने पीएमपीएलच्या व्यवस्थापकांना नोटीस बजावली आहे.
डासोत्पत्ती स्थाने ७ दिवसांत नष्ट करून त्याचा अहवाल सादर करावा. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिला आहे.
पावसाचे पाणी साचल्याने डासोत्पत्ती स्थानांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनियासदृश आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी (दि. १६) भोसरीतील पीएमपीएल डेपोला भेट दिली.
डेपोत २० ते २५ बसेस बंद अवस्थेत पडून आहेत. डेपोतील मोकळ्या जागेत पावसाचे पाणी साचून डासोत्पत्ती स्थाने निर्माण झाल्याचे निर्दशनास आले.
डेपोतील अस्वच्छतेमुळे नागरिकांना धोका संभवतो. तातडीने डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे आवश्यक आहे. डेपोत पडून असलेल्या बसची तातडीने विल्हेवाट लावावी. पुढील ७ दिवसांत डासोत्पत्ती स्थाने नष्ट करून अहवाल पालिकेला सादर करण्यास डॉ. रॉय यांनी सांगितले.























Join Our Whatsapp Group