पिंपरी (Pclive7.com):- मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात काळेवाडी-रहाटणी शिवसेना विभागाच्या वतीने काळेवाडी पेट्रोल पंप येथे मोदी सरकारचा जाहीर निषेध करत आंदोलन करण्यात आले.
यावेळी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी आलेल्या सर्व सामान्य नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी पेट्रोल व डिझेल भरण्यार्या नागरिकांना हेच का अच्छे दिन असं म्हणत शिवसेनेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
या आंदोलनामध्ये शिवसेना सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, अल्पसंख्याक शहरप्रमुख हाजी दस्तगीर मनियार, चिंचवड विधानसभा उपशहरप्रमुख हरेश नखाते, सुधाकर नलावडे, मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर, प्रहार संघटनेचे संजय गायके, विभागप्रमुख गोरख पाटील, प्रदीप दळवी, अंकुश कोळेकर, गणेश वायभट, सावता महापुरे, नरसिंग माने व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व आजी माजी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group