पिंपरी (Pclive7.com):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांच्यावर राजकीय द्वेषातून जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यातील आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी त्यांनी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना निवेदन दिले आहे.
सुरेश निकाळजे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डिलक्स चौक पिंपरी येथे मी बाहेर मित्रांसमवेत थांबलेलो होतो. त्यावेळी माझ्या पाठीमागून येऊन आमच्या वस्तीतील अनओळखी व्यक्तीने मला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बांबूच्या सहाय्याने माझ्या डोक्यावर हल्ला करून जखमी करण्याचा प्रयत्न केला.
परंतु सदर बाब लगेच माझ्या लक्षात आल्यामुळे तो हल्ला मी चुकवल्यामुळे बचावलो आहे. हा प्रकार (गुरूवारी दि.०५) रोजी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी घडला आहे.
सदरचा संपूर्ण प्रकार हा माझे राजकीय विरोधक यांनी सदर व्यक्तीकडून माझा घातपात व कोणी घडवून आणण्याच्या उद्देशाने केला असल्याची माझी खात्री आहे. याबाबत माजी कायदेशीर फिर्याद घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी सुरेश निकाळजे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.





















Join Our Whatsapp Group