पिंपरी (Pclive7.com):- विश्व हिंदु परिषद, बजरंग दलच्या वतीने श्री क्षेत्र टाळगांव चिखली प्रखंडचे सहसंयोजक स्वर्गीय विशाल (पिंटु) यादव यांच्या स्मरणार्थ कोकणातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला आहे.
कोकणात आलेल्या पुरानंतर संपूर्ण राज्यातून मदतीचा ओघ सुरू झाला. प्रत्येक जण आपल्या परीने कोकणात मदत पाठवत होते. आपण ही सर्व दानशुर मंडळींनी स्वर्गीय कै. विशाल (पिंटु) यादव यांच्या स्मरणार्थ श्री भैरवनाथ तरूण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत वस्तुरुपी मदत जमा झाली. सर्व प्रकारची मदत विंहिप, बजरंग दल व श्रीभैरवनाथ तरुण मंडळाचे कार्यकर्ते स्वतः पूरग्रस्त भागात जाऊन गाव, वाड्या, वस्ती याठिकाणी मदत पोचवली.
पोसरे (बौद्धवाडी, धामनंद), पोसरे (खुर्द धामनंद) कळंबसत्ते (वशिष्ठनगर चिपळूण) चोरवणे-निवे (सुतारवाडी) साप्रिली (आदिवासीवाडी) वावे(मुसाड, पूरग्रस्त) फोफळी (घाटमाथा) मुसाड (मदतनीस) मुसाड वावे (नवीन वसाहत बौद्धवाडी) कुंभार्लीघाट (कोयनानगर) अशा अती दुर्गम भागातील विविध कातकरी वाड्या या ठिकाणी पूरग्रस्त बांधवाना जीवनावश्यक वस्तु रूपी किराणा किट, ताडपत्री, पाणि, कपडे, औषधे वाटप करण्यात आले.
यावेळी स्वर्गीय कै.पै. विशाल (पिंटु) यादव प्रतिष्ठाण, श्री भैरवनाथ तरूण मित्र मंडळ, समस्थ ग्रामस्थ श्री क्षेत्र टाळगांव चिखली, शिवजंयती ऊत्सव समिती, विहिंप बजरंग दल पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.