पिंपरी (Pclive7.com):- मोहननगर, काळभोरनगर, चिंचवडस्टेशन, रामनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर, शंकरनगर, विद्यानगर, परशुराम आदि परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी माजी नगरसेवक मारूती भापकर यांनी केली आहे. यासंदर्भात भापकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.
मारूती भापकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मोहननगर, काळभोरनगर, चिंचवडस्टेशन, रामनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर, शंकरनगर विद्यानगर, परशुरामनगर आदी परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रचंड वावर आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक, कामगार यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
या परिसरात मोकाट कुत्री रात्रीच्या वेळेत खूप जोर जोरात भुकंतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेत नागरिकांची निद्रानाश होतो. लहान मुले घाबरून जागे होतात. हे मोकाट कुत्रे लहान मुले, महिलांच्या अंगावर गुरगुरुन धावतात. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच या परिसरातील सेकंन्ड, थर्ड शिपला जाणारे, येणारे कामगारांच्या वाहनाच्या मागे ही कुत्री धावतात. प्रसंगी चावा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हे कामावर येणारे जाणारे कामगार आपले वाहन जोरात पळवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे यापुर्वी अनेक लहान मोठे अपघात झाले आहे. यापुढे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता नाही.
त्यामुळे महापालिका आयुक्तांनी या गंभीर प्रकरणात स्वतः लक्ष घालून संबंधित विभागाला याबाबत योग्य उपाय योजना करण्याचे सक्त आदेश देऊन या विभागातील गंभीर समस्येचे विनाविलंब निराकारण करावे अशी मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group