पिंपरी (Pclive7.com):- भाजपा चिंचवड किवळे मंडळ महिला मोर्चाच्या वतीने मंगळागौर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे संयोजन भाजपा चिंचवड किवळे मंडळ महिला मोर्चा सरचिटणीस स्नेहा गाडे यांनी केले होते.
चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप व शहर अध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड किवळे मंडळ महिला मोर्चा व उन्नती महिला मंच वतीने आज (दि.१३) वीर बाबा मंदीर परिसरामध्ये आपली परंपरा जपत मंगळागौरचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच विधवा महिलांसाठी धान्य आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी प्रभाग १६ चे विद्यमान नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, नगरसेविका संगीता भोंडवे, स्विकृत नगरसेवक बिभीषण चौधरी, उपाध्यक्ष सुरेश नायर, लक्ष्मी वाल्मीक, शुभांगी सुतार, सरिता कांबळे, सारिका पटेल, जयश्री कुलकर्णी, उन्नती महिला बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तसेच महिलांनी पारंपरिक पंचमीचे खेळ, फुगड्या आणि झोके खेळले. यावेळी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. उपस्थित मान्यवरांचे आभार स्नेहा चंद्रकांत गाडे यांनी मानले.






















Join Our Whatsapp Group