पिंपरी (Pclive7.com):- नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने आज स्वातंत्र्याच्या 75 व्या दिन साजरा करण्यात आला, ध्वजारोहण करून ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन अमित गोरखे उपस्थित होते.
कोट्यवधी देशभक्तांच्या त्याग, बलिदान, समर्पणातून मिळालेलं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित राखण्याचा, भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मुल्यांची जपणूक करण्याचा, देशाचा प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचार पुढे घेऊन जाण्याचा, सर्वधर्मसमभावाचा आदर करीत सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर अथक, निरंतच चालत राहण्याचा आपण सर्वजण पुन्हा एकदा दृढनिश्चय करुया,’ असे आवाहन करीत गोरखे यांनी देशवासियांना स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी पिंपरी-चिंचवड शहराच्या नगरसेविका अनुराधाताई गोरखे, श्री समिर जेऊरकर, सर्व शिक्षक वृंद कर्मचारी उपस्थित होते.