पिंपरी (Pclive7.com):- भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनी आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी ७५ औषधी वृक्षांची लागवड केली आहे.
७५ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डी येथील ८४-८५ च्या १० वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविला आहे. या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत मेट्रो गार्डन, जाधव वस्ती रावेत येथे एकुण १४ प्रकारच्या ७५ औषधी वनस्पतींची लागवड केली आहे.
या विद्यार्थ्यांनी शिसम, जांभुळ, फणस, बेहडा, अडुळसा, अर्जुन, कवट, करंज, बकुळ, चिंच, आवळा, वावळा, कागदी लिंबु इत्यादी वृक्षांचे वृक्षारोपण केले.
या कार्यक्रमासाठी श्री. जहागिरदार सर आणि श्री. खळदकर सर आवर्जुन उपस्थित राहिले होते. श्री. जहागिरदार सरांनी यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व माजी विद्यार्थींचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात गौतम जाधव, अजित भोसले, राजू सुतार, किरण जाधव यांनी केले होते.


























Join Our Whatsapp Group