पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील ड्रिम्स स्केटिंग क्लब येथे एक तास झिग झ्याक स्केटिंग जागतिक विक्रमचे आयोजन करण्यात आले होते. या रेकॉर्डमध्ये पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागर-वाकड येथील स्केटर्सनी सहभाग घेतला होता. यावेळी ड्रिम स्केटिंग क्लबच्या तीन विद्यार्थ्यांनी हा विक्रम पूर्ण करून ५ वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स मध्ये स्वतःचे व क्लबचे नाव नोंदविले व राज्याचे नाव मोठे केले आहे.
वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटमध्ये देशातून अनेक राज्यातून हजारो स्केटर्सनी यात सहभाग घेतला होता. ड्रिम स्केटिंग क्लबचे स्केटर्स अनविका पवार (वय ७), कुशल नेवार(वय ६), व अनन्या कोटी (वय ५) यांनी हा रेकॉर्ड प्रस्थापित करून स्वतःचे नाव एक्सक्ल्युसिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड, किंग्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, होप इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड, दि मिरॅकल रेकॉर्ड इंडिया, ग्लोबल जीनियस रेकॉर्ड या वर्ल्ड रेकॉर्ड बुक्समध्ये नाव नोंदविले.
रेकॉर्ड पूर्ण होताच विजेत्या मुलांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच मान्यवरांकडून मेडल व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी स्केटिंग प्रशिक्षक वैभव बेळगी, राहुल बेळगी, वंदना बेळगी, सुरज दीक्षित, चिंतामण राऊत यांनी या रेकॉर्डचे ऑफिशियल काम पाहिले.
ड्रिम्स क्लबच्या पंधरा स्केटर्सनी आतापर्यंत हॉंगकॉंग, बेल्जियम, जकार्ता, मलेशिया बँकोक येथे झालेल्या इंटरनॅशनल चॅम्पियनशिप्स मध्ये २२ पदके पटकावली आहेत. तसेच गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ही नाव नोंदविले आहे.






















Join Our Whatsapp Group