प्रा. गणेश ढाकणे यांची भाजपा शहर चिटणीस पदावर निवड
पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पक्ष हा समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन योग्य व्यक्तींना संधी देणारा सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षितांबरोबरच समाजातील तळागाळातील उपेक्षित घटकांना देखिल बरोबर घेऊन पक्ष संघटना वाढविण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात पिंपरी चिंचवड शहरात भाजपा आणखी सक्षम होईल, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी केले.
पिंपरीत भाजपा शहर कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आ. लांडगे बोलत होते. या बैठकीत प्रा. गणेश रामराव ढाकणे यांची पिंपरी चिंचवड शहर भाजपा चिटणीस पदावर निवड जाहिर करण्यात आली. शहर अध्यक्ष आ. महेश लांडगे यांच्या हस्ते ढाकणे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी संघटन मंत्री रवी अनासपुरे, पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ता अमोल थोरात, जिल्हा सरचिटणीस राजू दुर्गे, नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, कार्यकारणी सदस्य गणेश वाळुंजकर, ओबीसी जिल्हा सरचिटणीस कैलास सानप, विशाल वाळुंजकर आदी उपस्थित होते.
यावेळी आ. लांडगे म्हणाले की, प्रा. गणेश ढाकणे यांनी लोकनेते गोपिनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वीस वर्षांपुर्वी शेवगाव, अहमदनगर येथे पक्षकार्यास सुरुवात केली ते उच्चशिक्षित असून शहरामध्ये मागील पंधरा वर्षांपासून खासगी कोचिंग क्लासच्या माध्यमातून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.
तसेच प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जय भगवान महासंघाच्या माध्यमातून ते पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून संघटनात्मक काम करीत आहेत. मागील सहा महिण्यांपुर्वी हसनापूर, ता. शेवगाव. जिल्हा अहमदनगर येथे उपसरपंच म्हणून निवडून आले आहेत.
पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील स्पर्धा परिक्षा देणा-या विद्यार्थ्यांना ते शिबीरांच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत असतात. जय भगवान महासंघाच्या वतीने वधू – वर मेळावे, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच पुरग्रस्तांना प्रत्यक्ष मदत, रक्तदान शिबीरांचे आयोजन असे विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. त्याची दखल घेऊनच त्यांची भाजपा शहर चिटणीस पदावर निवड करण्यात आली आहे, असेही भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे म्हणाले.