पिंपरी (Pclive7.com):- संत मदर तेरेसा उड्डाणपुलावरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या चिंचवडगावात उतरणा-या रॅम्पमुळे नागरिकांचे १.५ किलोमीटर अंतर वाचणार असून त्यामुळे नागरिकांच्या वेळेची व इंधनाची बचत देखील होणार आहे. तसेच शहरातील वाहतुक कोंडी कमी होणार असल्याचे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने एम्पायर इस्टेट येथील संत मदर तेरेसा उड्डाणपूलावरुन चिंचवडगावात उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी दोन्ही बाजूस रॅम्प बांधण्याच्या कामाचा शुभारंभ महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य राजेंद्र गावडे, शैलेश मोरे, शितल शिंदे, नगरसदस्या अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, जयश्री गावडे, कोमल मेवानी, स्वीकृत नगरसदस्य अॅड. मोरेश्वर शेडगे, विठ्ठल भोईर, महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, बापू गायकवाड, रविंद्र सुर्यवंशी, सुनिल पवार, अशोक कुटे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या या रॅम्प बाबत नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी होती त्या अनुषंगाने या रॅम्पचा शुभारंभ आज होत आहे. या रॅम्पचा उपयोग चिंचवड, काळेवाडी, थेरगाव, रहाटणी तसेच नागरिकांना होणार आहे असे सांगून या भागालगतची वाहतुक निश्चितच सुरळीत होणार असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
या रॅम्पसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल गोरखनाथ गावडे, पंढरीनाथ गावडे, उत्तम गावडे, राजेश गावडे, राकेश गावडे, निळकंठ गावडे, विलास भोईर, मल्हारी भोईर, महानंद भोईर, नकुल भोईर यांचा महापौर माई ढोरे तसेच मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच श्रीकांत सवणे, प्रमोद ओंभासे, बापू गायकवाड, रविंद्र सुर्यवंशी, सुनिल पवार, अशोक कुटे या अभियंत्यांचा आणि रोहीत मातेरे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
पिंपरी चिंचवड लिंक रोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाजवळील प्रस्तावित पुलाची लांबी १४१.४७ मीटर असून या पूलासाठी १५ कोटी ७९ लाख इतका खर्च येणार आहे. पुलाचे कामकाज १८ महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती अभियंत्यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसदस्य राजेंद्र गावडे यांनी, सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी तर आभार स्वीकृत नगरसदस्य अॅड. मोरेश्वर शेडगे यांनी मांडले.























Join Our Whatsapp Group