पिंपरी (Pclive7.com):- सत्ताधारी भाजपाने गेल्या साडेचार वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचाराचा कहर माजला आहे. मागील महिन्यात स्थायी समितीच्या कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या कारवाईने महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला असल्याचे अधोरेखित झाले. यानंतर स्थायी समिती बरखास्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शनेही करण्यात आली. आता पिंपरी चिंचवड शहरातील साफसफाई व स्वच्छता निविदेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेवर पुन्हा धडक देत हल्लाबोल आंदोलन केले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक पंकज भालेकर, विक्रांत लांडे, मयूर कलाटे, डब्बू आसवानी, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, जगदीश शेट्टी, तानाजी खाडे, नगरसेविका वैशाली घोडेकर, पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा शीलवंत, प्रवक्ते फजल शेख, विशाल काळभोर, रशीद सय्यद, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, माजी नगरसेविका शमीम पठाण यांच्या सह अनेक आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित आहेत.
(सविस्तर वृत्त लवकरच)