पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी अशोक भिकाजी तळेकर (वय ६२ – रा. रावेत) यांचे सोमवारी (३० ऑगस्ट २०२१) अल्पशा आजाराने निधन झाले.
थेरगाव येथील एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर चिंचवड लिंकरोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार संदेश पुजारी यांचे ते सासरे होत.
दशक्रिया विधी बुधवार दि.०८ सप्टेंबर रोजी चिंचवडगाव येथे कोरोना नियमांचे पालन करून करण्यात येणार आहे.






















Join Our Whatsapp Group