पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्यांच्या घरांवर शास्तीकराची टांगती तलवार कायम आहे. कोरोनामुळे बेरोजगारी अन् आर्थिक मंदीच्या कात्रीत सापडलेल्या नागरिकांना शास्तीची मोठी धास्ती आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देत शास्तीकर पूर्णतः माफ करावा, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक अॅड. सचिन भोसले यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
मुंबईत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकासकामांबाबत नुकतीच आढावा बैठक घेतली.
या बैठकीला शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उपसभापती नीलम गोऱ्हे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महेश पाठक, आयुक्त राजेश पाटील, संजय मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी भोसले यांनी शहरातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. शास्तीकर माफ करण्याची मागणी त्यांनी केली. मंत्री शिंदे यांनीही दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तत्काळ सूचना दिल्या आहेत.






















Join Our Whatsapp Group