पिंपरी (Pclive7.com):- भाजपाचा भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांना कंटाळून पिंपरी चिंचवड महापालिकेचे अपक्ष गटनेते व विद्यमान नगरसेवक कैलास (बाबा) भालचंद्र बारणे यांनी आज राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला आहे.
कैलास बारणे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यंमत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यलय, मुंबई येथे पक्ष प्रवेश केला.
या त्याप्रसंगी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) चे शहराध्यक्ष संजोग वाघेरे (पाटील), माजी विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, संतोष बारणे, अभयशेठ मांढरे (अध्यक्ष : अजित प्रतिष्ठाण), सतीशदादा दरेकर (राष्ट्रवादी काॅंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी, मा.नगरसेवक), ऋषिकेश रेवणनाथ काशिद (अध्यक्ष : कुंभार समाजोन्नती मंडळ, पिं.चिं.शहर जिल्हा, योगेश साळुंखे, प्रविण बारणे, शहाजी लोखंडे, अक्षय बारणे, आणि तुषार मोरे उपस्थित होते.
२०१७ मध्ये पिंपरी- चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर अपक्ष आघाडीच्या ५ नागरसेवकांनी कैलास बारणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला पाठिंबा दिला होता. आता बारणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे- पाटील म्हणाले की, भाजपामध्ये नाराजांची संख्या मोठी आहे. आगामी काळात अनेकजण राष्ट्रवादीत येणार आहेत. याबाबत सविस्तर भूमिका मांडण्यासाठी मी प्रसारमाध्यमांशी आज दुपारी संवाद साधणार आहे.