पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी गावचे ज्येष्ठ नागरीक व सेवानिवृत्त तहसिलदार बबनराव दशरथ कुदळे (वय 81 वर्षे) यांचे मंगळवारी (दि. 14 सप्टेंबर) निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पणतू असा परिवार आहे.
पिंपरी गावातील ज्येष्ठ नागरीक संघ, जोती मित्र मंडळ, सावता सेवक मंडळाचे ते संस्थापक होते. पिंपरी चिंचवड मनपाचे कर्मचारी दिनेश कुदळे यांचे ते वडील होत.