पिंपरी (Pclive7.com):- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘सेवा सप्ताह’चे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत नागरिकांना स्वच्छता किट, सॅनिटाईझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले, अशी माहिती स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी दिली.
दिनेश यादव म्हणाले की, देशाची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ व्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’चे आयोजन केले आहे. दि.१४ ते २० सप्टेंबर २०२१ दरम्यान हा सप्ताह होणार आहे. त्याअंतर्गत इंद्रायणी नदी घाट, वजन काटा, व शिवसाई पंतसंस्था याठिकाणी स्वच्छता कीट, सॅनिटाईझर आणि मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी अनिल यादव, कुमार होले, बाळासाहेब पवार, रामाभाऊ कोहिनकर, नाना पवार, प्रकाश चौधरी, दिपक घन, शरद गोरे, स्वराज पिंजण, सुलभ इंटरनॅशनलचे उपनियंत्रक संतोष सिंह, विनोद पाठक, राजेश्वर चौधरी, उमाशंकर सिंह, तरुण झा, विपीन झा, उल्हास वाणी आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group