पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरव येथील तानाजी जवळकर सोशल फाऊंडेशनच्या वतीने ‘आशिर्वाद गौरी गणपतीचा’ या ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पिंपळे गुरव येथे संपन्न झाला.
महिलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते तानाजी जवळकर व तृप्तीताई जवळकर यांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून परिसरातील महिला भगिनींकरिता ‘आशिर्वाद गौरी गणपतीचा’ या ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. बक्षिसे स्वीकारतांना महिलांच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह पाहायला मिळाला. तसेच असे उपक्रम यापुढील काळात देखील तानाजी जवळकर यांनी राबवावेत अशी मागणी यावेळी महिलांनी केली.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, वैशाली काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, राजू लोखंडे, शिवाजी पाडुळे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
यावेळी शाम जगताप, माजी नगरसेवक राजू लोखंडे, पै. गणेश जगताप, शोभाताई आदियाल, सामाजिक कार्यकर्ते अंकुशआप्पा जवळकर, मुकेश पवार, मधुकर रणपिसे, बाळासाहेब काशीद, जितेंद्र जवळकर, अतुल काशीद, दिपक काशिद, नितीन काशिद, गणेश शिवाजी जगताप, उज्वला ढोरे, संगीताताई पवार आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्रय कदम यांनी केले, तर अमर आदियाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.





















Join Our Whatsapp Group