पिंपरी (Pclive7.com):- मोहननगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूरी मिळाली आहे. स्थानिक नगरसेविका मिनल यादव यांचा यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरू होता. महासभेत पुतळा उभारण्याच्या कामास सर्वानुमते मंजूरी मिळाल्याने मिनल यादव यांच्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे.
याबाबत माहिती देताना मिनल यादव म्हणाल्या की, मोहननगर येथील जिजामाता सांस्कृतिक भवनच्या कोपऱ्यातल्या मोकळ्या जागेमध्ये “छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरीमध्ये, “सिंहासनावर” बसलेला पुतळा उभारण्यात यावा अशी येथील जनतेची मागणी होती.
या चौकांमध्ये एक रस्ता रामनगर, तर दुसरा काळभोर नगर येथे जातो. त्यामुळे मोहननगर, रामनगर, काळभोरनगर मधील सर्व शिवभक्तांना एक ऊर्जा स्थान निर्माण होईल. तसेच पारंपारिक शिवजयंती करण्यास या ठिकाणी मोठी जागा सुद्धा उपलब्ध होणार आहे.
सोमवारी (दि.२०) रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संपूर्ण बहुमताने या विषयाला मंजुरी मिळाली आहे. त्यापूर्वी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये पुतळाच्या कामासाठी मंजुरी मिळवली आहे.
प्राथमिक जागा शोधण्यापासून, बजेट पुस्तिकेत नाव घेणे, सल्लागार नेमणे, स्थायी समिती बजेट वर्गीकरण करणे तसेच सर्वसाधारण सभेत विषय मंजूर करण्याचा सर्व वेळोवेळी पाठपुरावा केला असून पुतळा उभारण्याच्या कामाचा मार्ग सुकर झाला असल्याचे नगसेविका मिनल यादव यांनी ‘पीसी लाईव्ह न्यूज’शी बोलताना सांगितले.






















Join Our Whatsapp Group