पिंपरी (Pclive7.com):- नवरात्री उत्सवानिमित्त पिंपरी युवासेनाच्या वतीने प्रभाग ३० दापोडी-फुगेवाडी-कासारवाडी मधील नागरिकांसाठी विविध सार्वजनिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचे उद्घाटन आज (दि.०८) शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख एकनाथ हाके, शीला मामी जाधव, प्रमोद गायकवाड, संजय गरुड, रवी कांबळे, राहुल जाधव, अक्षय गायकवाड, राहुल जाधव, रामभाऊ शिंगोटे, प्रभाकर हिंगे, सोपानतात्या सातपुते, दीपक साळवे, संदेश बोराडे, गुरुदत्त जाधव, मनीषा पाटोळे, मनीषा मडके, शुभांगी गायकवाड उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके यांनी केले आहे.
या उपक्रमात आज दिनांक ०८ ऑक्टोबर व ०९ ऑक्टोबर रोजी सर्व शासकीय दाखले (जातीचा दाखला, रहिवाशी दाखला, उत्पन्न दाखला, नॉन क्रीमीलअर दाखला) हे नागरिकांना मोफत काढून देण्यात येणार आहे. तसेच १० ऑक्टोबर रोजी मोफत पॅनकार्ड व रेशन कार्डमध्ये नाव वाढविणे, कमी करणे, पत्ता बदल, नवीन, दुरुस्ती करून देण्यात येणार आहे.
दिनांक ११ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर पर्यंत आयुष्यमान भारत योजना राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाची वेळ सकाळी १० ते ०६ पर्यंत असणार आहे. निलेश हाके जनसंपर्क कार्यालय, एस. बी. पाटील स्कूल रोड सुखवानी ग्लोरी बिल्डिंग जवळ कार्यक्रमचे स्थळ आहे.
तरी प्रभाग क्रमांक ३० फुगेवाडी-दापोडी-कासारवाडी मधील जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे पिंपरी युवासेनेचे युवाअधिकारी निलेश हाके ह्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 8806720672 व 7276970972 या क्रमांकावर संपर्क साधावा.