पिंपरी (Pclive7.com):- मोहननगर येथील छत्रपती शिवाजी महाराज कमान येथील रस्त्याच्या सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच या कामाअंतर्गत बाल ब्रह्मचारी सिदाजी आप्पा चौकात नवीन गाय वासरूचे शिल्प दिवाळी वसुबारस पूर्वी बसविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नगरसेविका मीनल विशाल यादव यांनी दिली.
यासंदर्भात माहिती देताना मीनल यादव म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शिवसेना नगरसेविका, स्थायी समिती सदस्य मीनल विशाल यादव आणि शिवसेना संघटक विशाल बाळासाहेब यादव यांच्या संकल्पनेतून मोहननगर येथील छत्रपती शिवाजी महाराज कमान – मेहता हॉस्पिटल येथे रस्त्याच्या सुशोभिकरणाचे कामाने अंतिम टप्प्यात आलेले आहे.
या कामा अंतर्गत बाल ब्रह्मचारी सिदाजी आप्पा चौकामध्ये जुने गाय-वासरूचे शिल्प हटवून त्या ठिकाणी नवीन गिर गायचे गाय वासरू शिल्प बसविण्यात येणार आहे. दिवाळीत वसुबारस सणाच्या आधी हे शिल्प बसविण्यात येणार आहे. तसेच बालाजी मंदिर चौकामध्ये सुशोभिकरण करण्यात येत आहे. येथे मोठी दीपमाळ उभी करण्यात येणार आहे.
नगरसेविका मीनल यादव यांच्या पाठपुराव्यामुळे मोहननगर येथील कामांना यश मिळत आहे. नुकतेच महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी या सर्व कामांना मंजुरी देऊन पुढील काम त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मोहननगर येथील या गाय वासरूच्या शिल्पामुळे लिंगायत, गवळी समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच सर्वच स्तरातून या नवीन शिल्पाचे स्वागत होत आहे.





















Join Our Whatsapp Group