पालकांनी मुलांना घरातील भिंतीवर मोकळेपणाने व्यक्त होऊ द्यावे – देवदत्त कशाळीकर
पिंपरी (Pclive7.com):- चिखली-मोशी येथील इनोव्हेटिव वर्ल्ड स्कूलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कला व हस्तकला सजावटीस विद्यार्थ्यांना, राष्ट्रीय पुरस्कार विजेते सर्वोत्कृष्ट सृजनशील छायाचित्रकार श्री. देवदत्त कशाळीकर यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना श्री.कशाळीकर म्हणाले की, मुलांच्या प्रत्येक कलेला वाव देऊन त्यांना कलेमध्ये जर स्वातंत्र्य दिले तर उद्याचे सर्वच क्षेत्रातील करियर जास्त सृजनशील व समाजाभिमुख असेल, त्यामुळे मुलांना सर्व माध्यमातून व्यक्त होऊ द्या. मुलांच्या कलेची जाण जर पालकांनी नीट ठेवली तरच उद्याचा संवेदनशील माणूस देश घडवेल.
विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला आणि कल्पकतेला वाव मिळावा याच उद्देशाने इनोव्हेटिव वर्ल्ड स्कूलमध्ये विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विविध कल्पक विचार असतात. ते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधत असतात. त्यांच्या विचारांना आकार देण्याचे काम आमचे शिक्षक नेहमी करीत असतात. असे संचालिका कमला बिष्ट म्हणतात.
गणेश चतुर्थी पासून ते विजया दशमी पर्यंतचा कालावधी विद्यार्थ्यांनी स्वत: कलात्मक गृह सजावटी करून अनुभवला. विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनविणे असो वा टाकाऊ-घरघुती वस्तू पासून सजावट केलेली असो. कला व हस्तकला पासून आरासांची-घरांची सजावट करून सुशोभीकरण केले. सर्वच विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कलाकुसरी सादर केल्या.
विद्यार्थ्यांच्या समोर सकारात्मक विचार नेहमी सोबत असावे म्हणून त्यांच्या वर्गांना देखील आशा, आनंद, बहर, सूर्यप्रकाश, नम्र, प्रामाणिकपणा, सुसंवाद, धैर्यवान, विनम्र, उत्सुक, उत्साही, तेजस्वी आणि मेहनती अशी सकारात्मक नावे दिली आहेत. वर्गानुसार सर्वोत्कृष्ट कलाकुसरींना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने श्री. कशाळीकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
जुनिअर केजी मधून आरुष हांडे, श्रीयान दुधे, पुष्कराज कुलकर्णी, सुमेध पाटील, शिवन्या सप्रे, अवनीश कदम.सिनिअर केजी मधून यक्षित चौधरी, रुद्विका राजे महाडिक, वेद व वैदेही शिर्के, प्रिशा शर्मा, नक्ष बिरादार, शिवांक बरावडे.
पहिली मधून अयांश वारके, उर्वी बेलसरे, दिव्यांश पवार, शुभय तिवारी, ऋजुता राजे, वरद जाधव, आराध्या कुलकर्णी, अथर्व सोनावणे, आरव शिंदे.
दुसरी मधून आरोही जाधव, कौतुक बरबडे, अर्णव शिंदे, आरव चौहान, शार्विल मोरे, श्रीश पवार, दुर्वा येडूलकर, अर्णव मेन, इशान हिरे.
तिसरी मधून डिंपल पवार, शौर्य बोरचाटे, ओवी कुदळे.चौथी मधून खुशी राठोड, दिशांत साबने, स्वराज दराडे.पाचवी मधून आराध्या चव्हाण, पुरुषोत्तम गुप्ता, अदिती नवले.
या विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळविली. सर्व विद्यार्थांना पालक शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.