पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुणे महानगर विकास प्राधिकरण ऐन दिवाळीच्या तोंडावर अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई सुरू केली आहे. मोठ्या पोलिस बंदोबस्तात सोमवारी (दि.२६) दिवसभर हिंजवडीतील तीन अनधिकृत बांधकामे बुलडोझर लावून जमीनदोस्त केली.
हिंजवडीतील इमारती या पाच-सहा मजली असल्याने मोठे बुलडोजर आणि मशिन आणण्यात आल्या होत्या.
पीएमआरडीएच्या उपजिल्हाधिकारी तथा अनधिकृत बांधकाम विभागप्रमुख मोनिका सिंह व अतिक्रमण विभाग नियंत्रक पोलिस उपायुक्त नीलेश अष्टेकर यांच्या अधिपत्याखाली आठ ते दहा अभियंत्यांच्या उपस्थितीत ही कारवाई मोहीम राबविण्यात आली.
कोरोनाकाळात सुरू असलेल्या या अनाधिकृत बांधकामांना जुलै महिन्यातच नोटीस पाठविली असल्याचे मोनिका सिंह यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, की बिल्डरांनी रितसर बांधकाम परवानगी घेऊनच बांधकामे करावीत. हिंजवडीतील सर्व्हे नंबर २६१मध्ये सोमवारी झालेल्या कारवाईसाठी सहा पोकलँड, पीएमआरडीएचे अधिकारी व पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारपर्यंत ३ इमारतीची चालू असलेली बांधकामे पाडली. यामुळे अनधिकृत बांधकामे करत असलेल्या इतरांना मात्र धास्ती बसली आहे.






















Join Our Whatsapp Group