पिंपरी (Pclive7.com):- ‘चला घरासमोर किल्ला बांधूया, स्वराज्य हिताचे भवितव्य साधूया’ या उक्तीला अनुसरून यंदाच्या दिवाळीला आमदार महेशदादा लांडगे युवा मंच व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने बाल मावळ्यांसाठी ‘घर तिथे किल्ला’ या किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आकर्षक किल्ल्याला भेटवस्तू देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत २० वयोगटाच्या आतील स्पर्धकांना सहभागी होता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किशोर लोंढे – 8802013030, काका शेळके – 9881245572 यांच्याशी संपर्क साधून स्पर्धकांनी आपले नाव, पत्ता व बनवलेल्या किल्ल्याचा फोटो Whatsapp वर पाठवावा.स्पर्धेचा निकाल व बक्षीस समारंभाबाबत सवडीने कळविण्यात येईल.
प्रभागातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक स्विकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group