पिंपरी (Pclive7.com):- निगडी ते लोणावळा या नवीन बससेवेचे उद्घाटन पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, मनसे गटनेते सचिन चिखले, क्रीडा, कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, नगरसेविका सुमन पवळे, नगरसेविका पुणे ज्योस्नाताई एकबोटे, चिएफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) पीएमपीएमएल दत्तात्रय झेंडे, आगार व्यवस्थापक संत तुकारामनगर संतोष माने आदि उपस्थित होते.
निगडी ते कामशेत दरम्यान सुरु असलेली पीएमपीएमएलची बस सेवा लोणावळ्यापर्यंत करण्यात यावी, अशी अनेक वर्षांपासून नागरिक, विद्यार्थी व कामगार वर्गाची मागणी होती. आकुर्डी परिसरात कॉलेज व कामासाठी जाणारे कामगार व विद्यार्थी यांची गैरसोय लक्षात घेता ही बससेवा निगडी ते लोणावळा सुरु व्हावी अशी मागणी होती.
५५ रुपये तिकीटदर
शुक्रवारपासून नऊ बस धावणार असून, पुढे नऊच्या अठरा बसेस लोणावळा ते निगडी धावतील असे निगडी डेपोचे प्रमुख शांताराम वाघेरे यांनी सांगितले. निगडी ते लोणावळा पीएमपीएमएलच्या नऊ बसेस धावणार असून लोणावळा ते निगडी फक्त ५५ रुपये असा प्रत्येकी तिकीट दर राहणार आहे.