पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटाच्या काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाची सुरूवात आज दुपारी २ वाजता आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन या कामगार भवनातून सर्वप्रथम कामगारांनाच काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व बहाल करत या अभियानाची सुरूवात करण्यात आली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटाच्या वतीने संपूर्ण देशभर या सदस्य नोंदणी अभियानाचा विशेष नोंदणी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या अनुषंगाने १ नोंव्हेबर २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
यावेळी अभियानाची सुरूवात करताना सोमनाथ वालसंगे, लक्ष्मण वाघमारे, दत्तात्रय रनसिंग, चंद्रकांत जाधव व सुदाम कांबळे या कामगारांचे सदस्यत्व अर्ज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्विकारण्यात आले. ही नोंदणी घोषित कालावधीत प्रत्यक्षपणे व डिजीटल माध्यमातून करण्यात येणार आहे. केवळ रू.५/- (पाच रुपये) हे सदस्य नोंदणी शुल्क आहे.
या प्रसंगी बोलताना डॉ.कैलास कदम म्हणाले, “या कामगार नगरीचा विकास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाला आहे ही उद्योगनगरी नावारुपास काँग्रेसच्या धोरणांमुळेच आली म्हणूनच या नगरीतील काँग्रेस सदस्य नोंदणीची सुरुवात या श्रमशक्ती कामगार भवनातून सर्वप्रथम कामगारांना सदस्यत्व देऊन करत आहोत.
तसेच आपण सर्व नागरिकांनी, कामगारांनी, शेतकरी, व्यापारी, उद्योजक, फेरीवाले, ग्रहिणी, युवक, विद्यार्थी, व्यावसायिक सर्वांनीच काँग्रेस सदस्यत्व स्विकारत भाजपा सरकार च्या अन्यायकारक धोरणांना विरोध नोंदवावा” असे आवाहन कदम यांनी केले.
या प्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम, माजी महापौर कविचंद भाट, प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे माजी अध्यक्ष अशोक मोरे, ज्येष्ठ महिला नेत्या माजी नगरसेविका निगारताई बारस्कर, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, ॲड.के एम रॉय, पुणे मल्याळी फेडरेशनचे अध्यक्ष के. हरिनारायणन, आशाताई काकडे, प्रतिभा कांबळे, ख्रिश्चन एकता मंचाचे अध्यक्ष प्रकाश पाठारे, पिपंरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, विश्वनाथ जगताप, रवि नांगरे,अजिंक्य बारणे, जनार्दन पोलकडे, सुनिल राऊत, ईस्माईल संगम, माऊली मलशेट्टी, किरण नढे, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group