पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे उपाध्यक्ष युवानेते रामभाऊ यांच्या प्रयत्नातून वाकड परिसरातील सोसायट्यांमध्ये बोअरवेलचे काम पूर्ण करण्यात आले. चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीतून वाकडमधील सोसायट्यांमध्ये हे काम करण्यात आले.

याबाबत माहिती देताना रामभाऊ वाकडकर म्हणाले की, झपाट्याने वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे गेल्या अनेक वर्षापासून वाकड परिसरात पाण्याची मोठी समस्या भेडसावत होती. मात्र चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड परिसरातील पाण्याची समस्या सुटत आहे.
लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीतून वाकड येथील वेस्टर्न ऐव्हिनिव्ह, अँटलांटा-१, अँटलांटा-२, वेदांता या सोसायटीमध्ये बोअरवेल बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
वाकड परिसरातील उर्वरित सोसायट्यांमध्ये देखील हा उपक्रम लवकरच राबविण्यात येणार असल्याची माहिती रामभाऊ वाकडकर यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group