नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन आणि नगरसेविका सविता खुळे यांच्या वतीने रहाटणीकरांना सांगीतिक मेजवानी
पिंपरी (Pclive7.com):- दीपावली सणाचे औचित्य साधून रहाटणी प्रभाग क्रमांक 27 मधील विमल गार्डन याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी संध्या’ या भावगीतांच्या कार्यक्रमाचा नागरिकांनी मनमुरादपणे आनंद लुटला.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन व नगरसेविका सविता बाळकृष्ण खुळे यांनी या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाच्या महापौर उषा ढोरे व उद्योजक शंकर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगरसेवक चंद्रकांत नखाते, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, नगरसेविका आरती चोंधे, स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, संदीप गाडे, संदीप नखाते, संजय गांधी निराधार योजना समितीचे नरेंद्र माने, अश्विनी तापकीर, टाटा मोटर्स एम्प्लॉइज युनियनचे नामदेव शिंत्रे, आनंद मित्र मंडळाचे सदस्य, बळीराज नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य, रहाटणी प्रभागातील सर्व सोसायट्यांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमांतर्गत नागरिकांनी अस्सल मराठी भावगीते, भक्तिगीते, चित्रपट संगीत या गीतांचा मनसोक्त आनंद घेतला. तसेच गीतगायनासोबतच दिवाळी फराळाचाही आस्वाद लुटला. यावेळी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन व नगरसेविका सविता खुळे यांनी नागरिकांशी संवाद साधून सर्वांना आरोग्यदायी व आनंददायी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.





















Join Our Whatsapp Group