मुळशी (Pclive7.com):- जगाच्या नकाशावर असलेल्या आयटीनगरी हिंजवडी गावच्या सर्वोच्च पदावर म्हणजे सरपंचपदी विशाल साखरे बहुमताने विजयी झाले आहेत.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2021/11/satyam-diwali-offer-1000-x-1000.jpg)
मावळते सरपंच विक्रम साखरे यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्याने पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंच पद रिक्त राहिल्यानंतर सोमवारी सरपंच निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. यावेळी एकूण सरपंच पदासाठी ३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.
विशाल साखरे यांची निवड झाल्यानंतर पुष्पहार देऊन त्यांचा ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या. विशाल साखरे यांच्या रूपाने हिंजवडी गावाला एक तरुण आणि दूरदृष्टी असणारा सरपंच मिळाला आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सरपंच विशाल साखरे हिंजवडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव काम करतील असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. साखरे यांच्या निवडीचे वृत्त समजताच हिंजवडीच नव्हे तर मुळशी, मावळ, पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातुन साखरे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
सरपंच निवडीच्या प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी सुहास कांबळे, तलाठी सागर शेलार, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय भोजने यांनी कामकाज पाहिले.
युवा नेते सुरेश हुलावळे, माजी सरपंच मल्हारी साखरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संतोष साखरे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक वसंत साखरे, माजी सरपंच शामराव हुलावळे, तानाजी हुलावळे,दिलीप हुलावळे, शिवाजी जांभुळकर, राहुल जांभुळकर, प्रदीप साखरे,शंकर हुलावळे, संदीप साखरे, सूर्यकांत साखरे, बाबासाहेब साखरे, हिरामण साखरे, कुंडलिक जांभुळकर, विश्वास जांभुळकर आभार माजी उपसरपंच प्रवीण जांभुळकर यांनी मानले.