पिंपरी (Pclive7.com):- शिवभूमी प्रतिष्ठान आकुर्डी प्राधिकरण आणि विद्यमान नगरसेविका शर्मिला राजेंद्र बाबर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “किल्ले बनवा, इतिहास जागवा” स्पर्धेत नुपूर पटवर्धन प्रथम, तर अवनी डांगे हिने व्दितीय क्रमांक मिळवला.
दिपावलीनिमित्त आयोजित स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ नुकताच प्राधिकरणातील सावरकर भवन येथे भाजप नेते व पिंपरी विधानसभा प्रभारी सदाशिव खाडे, नगरसेविका शर्मिला बाबर आणि सचिन कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला.
निगडी प्राधिकरण परिसरातील वय वर्षे 6 ते 20 या वयोगटातील एकूण 52 स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्यापैकी नुपूर पटवर्धन (प्रथम), अवनी डांगे (व्दितीय), समरजीत फटांगरे (तृतीय), आदित भोईटे (चतृर्थ) आणि जय कदम (पाचवा) यांनी पारितोषिक पटकावले.
प्रथम क्रमांक नुपूर पटवर्धन (दादा दादी उद्यान, सेक्टर नं. २४, प्राधिकरण निगडी), व्दितीय अवनी डांगे ( ब्लॉक नं. २६/८, सेक्टर नं. २८, गंगानगर, निगडी), तृतीय समरजीत फटांगरे (२०१/२६, प्राधिकरण निगडी), चतुर्थ आदित भोईट (प्लॉट नं. ३९, सेक्टर नं. २७, प्राधिकरण निगडी) आणि पाचवा क्रमांक जय कदम (पांढरकर वस्ती, आकुर्डी) मिळाला. विजेत्यांना बक्षिसाचे, तर सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना नगरसेविका शर्मिला बाबर म्हणाल्या, स्पर्धेच्या निमित्ताने मुलांमध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांचा कार्य जाणून घेण्याची उत्सूकता मुलांमध्ये दिसते. त्या माध्यमातून मुलांना शिवरायांचा पराक्रमी इतिहास समजतो आहे. त्यांच्या कार्यापासून मुलांनी आदर्श घ्यावा आणि त्यांचे उतुंग व्यक्तिमत्व घडवावे.























Join Our Whatsapp Group